पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी माध्यम माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीचा शुभेच्छा चिंतनपर कार्यक्रम सोमवारी (दि. 20) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले तसेच इतर मान्यवर संस्थेचे सहसचिव श्री. थोरात यांच्या हस्ते संस्थेचे प्रेरणास्थान कै. जनार्दन भगत यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास सत्रे, पर्यवेक्षक कैलास म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक श्री. चव्हाण, मराठी माध्यम प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. मानकर, इंग्रजी माध्यम-प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे, पूर्व प्राथमिक इंग्रजी माध्यम मुख्याध्यापिका संध्या अय्यर उपस्थित होते.
इयत्ता नववीच्या सर्व विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना आपल्या, भाषण, कवितांमधून शुभेच्छा दिल्या. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी ध्येयगीत सादर केले.राधिका शिर्के मॅडम यांनी शिक्षकप्रतिनिधी म्हणून प्रेरणागीत सादर केले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेप्रती प्रेम आपल्या भाषणातून व्यक्त केले. वाय. टी. देशमुख यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या. सहसचिव श्री. थोरात यांनी आपल्या मनोगतातून प्रेरणादायी विचार सादर करताना कवी कुसुमाग्रजांची ’कणा’ ही कविता सादर केली. या अशा भावपूर्ण वातावरणात दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेचा निरोप घेताना अश्रू अनावर झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नववीच्या विद्यार्थ्यांनी केले. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव एस. टी. गडद, संस्थेचे सर्व कार्यकारी मंडळ, सर्व पदाधिकारी, आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उज्जवल यश मिळावे यासाठी शुभेच्छा दिल्या.
Check Also
पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच
सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …