पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 70 व्या वाढदिवसानिमित्त 70 कार्यक्रम उपक्रमांतर्गत आज पनवेल तालुक्यातील रिक्षाचालकांना नवी मुंबई रिक्षाचालक मालक सेवाभावी संस्था व राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या माध्यमातून रिक्षाचालकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने आज नवीन पनवेल येथे कोरोना कवच पडद्यांचे वाटप करण्यात आले.
कोरोनामुळे रिक्षा चालकांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागली, अनेकांना उपासमार सहन करावी लागली तर काहींना आर्थिक परिस्थितीने ग्रासले. आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला असून स्वतःची व ग्राहकांची काळजी घेणे हे रिक्षाचालकांचे प्रथम कर्तव्य आहे. हा उद्देश ठेवून पनवेलमधील रिक्षाचालकांना कोरोना कवच पडद्याचे वाटप करण्यात आले.
या वेळी अश्वत्थामा जेष्ठ नागरिक संघ नवीन पनवेल अध्यक्ष प्रकाश विचारे, उपाध्यक्ष सुरेंद्र पाटील, सेक्रेटरी साहेबराव जाधव, नवी मुंबई रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष दिलीप आमले, वंदेमातरम जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष रवी नाईक, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, भैरवनाथ रिक्षाचालक मालक संघटना विचुंबे-देवद-उसर्ली-पोदी अध्यक्ष विजय दुन्द्रेकर, गावदेवी रिक्षा चालक संघटना उसर्ली अध्यक्ष देवेंद्र भगत, विजया लक्ष्मी रिक्षा संघटना नेरे अध्यक्ष राम ठाकूर, गावदेवी रिक्षा संघटना आकुर्ली उपाध्यक्ष दत्ता भोपी, नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, उपाध्यक्ष राजपाल शेगोकार, सचिव सुरेश भोईर, ओमकार महाडिक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच रिक्षाचालक उपस्थित होते.