पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या 2022-23च्या स्थानिक विकास निधीतून शाळांना डिजिटल साहित्य वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार पनवेल, उरण परिसरातील शाळांना संगणक देण्यात आले आहेत. कोकणातील शाळा डिजिटल करण्याचा उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला. यामध्ये कळंबोली सेक्टर 14 ज्ञानमंदिर शाळा, देवीचापाडा येथील माध्यमिक विद्यालय, चिंध्रण, सार्वजनिक विद्यामंदिर साई, उरणमधील सिटीजन एज्युकेशन सोसायटीचे ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अॅण्ड कॉमर्स, पी. डी. पाटील माध्यमिक शाळा, चिरनेर, स्वातंत्र्यवीर माध्यमिक विद्यालय शेवा, जनरल एज्युकेशन इन्स्टिट्युट, उरण या शाळांना प्रत्येकी एक एक संगणक देण्यात आले. या संगणकांचे (डिजिटल साहित्य) वाटप भाजप तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, प्रल्हाद केणी, तसेच उरण नगर परिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे, भाजप उरण शहराध्यक्ष कौशिक शहा, पदाधिकारी, युवा कार्यकर्ता शुभ पाटील तसेच अन्य उरणचे भाजप उपस्थित होते.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …