पनवेल : बातमीदार
तालुक्यातील कोलखे पेठ येथील पतीने पत्नीची चाकूच्या सहाय्याने हत्या केल्याची घटना घडली असून त्यानंतर पतीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बबिता पवार असे या महिलेचे नाव आहे. कोळखे, पेठ येथील गणपत पवार (45) यांचा बबिता पवार (25) यांच्याशी दुसरा विवाह झाला आहे. 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता पत्नी घरकाम करत नाही व चारित्र्याच्या संशयावरून गणपत याने बबिता हिचा चाकूच्या साहाय्याने खून केला. त्यानंतर त्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास पोलीस करत आहेत.