पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आठ लाख 36 हजार रुपयांच्या निधीतून माऊली सोसायटी रस्त्याचे काँक्रीटीकरण्यात आले आहे. या रस्त्याचे लोकार्पण आणि 10 लाख रुपयांच्या निधीतून निलकंठ सोसायटी ते ग्रीन व्हॅली सोसायटीपर्यंतच्या करण्यात येणार्या रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास विचुंबे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रमोद भिंगारकर, पाली देवद जि. प. विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, ग्रामपंचायत सदस्य नितीन भोईर, अनंता गायकवाड, विनोद वाघमारे, दिनेश वाघमारे, भाजप अनुसूचित जाती मोर्चा ग्रामीण अध्यक्ष अनिवाश गायकवाड, धनाजी भोईर, चेतन सुरते, आनंद गोंधळी, मांजरेकर, राकेश मोरे, संदीप वाघमारे, निलेश वाघमारे, के. डी. वाघमारे, महेश भिंगारकर, प्रेम भिंगारकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा क्रीडा मेळा उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती
उलवे नोड ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर पब्लिक …