Breaking News

न्यायालयीन लिपिकाची लुटमार करणारे दोघे गजाआड

पनवेल : वार्ताहर

पनवेल न्यायालयातील कनिष्ठ लिपीकाला तीन तरुणांनी डोंबाळे कॉलेज जवळ नेऊन त्याला बेदम मारहाण करीत मोबाईल फोन, घडयाळ, रोख रक्कम साडे पाच हजार आणि इतर ऐवज लुटून पलायन केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी दोन तरुणांना तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या आधारे अटक केली आहे.

पनवेल न्यायालयात कनिष्ठ लिपीक असलेले देवानंद प्रकाश खंडारे (वय 35) कर्जत येथे राहण्यास आहे. न्यायालयातून घरी जाण्यासाठी मोटारसायकलवरून निघाला असताना ठाणा नाका येथे एका तरुणाने आई आजारी असल्याचे कारण सांगून त्याला पुढे सोडण्याची विनंती केली. त्यामुळे देवानंद यान तरुणाला आपल्या मोटरसायकलवर बसवले. त्यानंतर तरुणाने देवानंद याला प्रथम करंजाडे येथे आणि त्यानंतर त्याला डोंबाळा कॉलेज लगतच्या महादेव मंदिराजवळ नेले. यानंतर तिथे उपस्थित असलेल्या त्याच्या इतर दोन साथीदारांनी त्याला मारहाण करून विवो कपंनीचे मोबाईल, टायटन कपंनीचे घड्याळ, साडे पाच हजार रोख रक्कम व मोटार सायकलची बॅटरी चोरी करून पळून गेले.

या घटनेची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांकडून आरोपींची माहिती काढुन आरोपींचे येण्याचे ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी आरोपी आदित्य महाडीक (वय 20, रा. करंजाडे) आणि करण सिंग (वय 20, रा.करंजाडे) यांना ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेला विवो कंपनीचा मोबाईल, गुन्हा करण्यासाठी वापरलेले हेल्मेट जप्त केले आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply