Breaking News

सिडकोने रहिवाशांना सुविधा द्याव्यात

आमदार महेश बालदी यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
सिडकोच्या माध्यमातून रहिवाशांना जास्तीत जास्त मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी गुरुवारी (दि. 6) सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. अशोक शिनगारे व अधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. सिडकोने आपल्या हद्दीतील विकासकामांवर भर देण्याची आग्रही मागणी आमदार बालदी यांनी या वेळी केली.
उरण विधानसभा मतदारसंघात असलेल्या करंजाडे, उलवे, पाटणोली, नानोशी, द्रोणागिरी या सिडको हद्दीतील परिसराचा विकास करण्यासंदर्भात या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. करंजाडे येथे खेळाचे मैदान, शाळा व रुग्णालय, उलवे नोडमध्ये कब्रस्थान, दफनभूमी, मशीद, शाळा, रुग्णालय, खेळाचे मैदान, पाटणोली-नानोशी येथे नळजोडणी, शाळा इमारत, स्मशानभूमी, द्रोणागिरी सेक्टर 52 ते 56मध्ये पाणीपुरवठा आदी सुविधांची मागणी आमदार महेश बालदी यांनी सिडकोकडे करून लवकरात लवकर कार्यवाही करा, अशा
सूचना केली. या वेळी सिडकोने सकारात्मक प्रतिसाद देत विकासकामे करण्याची ग्वाही दिली.
या बैठकीस सिडकोचे मुख्य अभियंता धायतकर, मुख्य आरोग्य अधिकारी बावसकर, तर भाजपकडून ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश पाटील, उपसरपंच अमर म्हात्रे, कर्णा शेलार, वैभव पाटील, समीर केणी, मंगेश शेलार, किरण मुंबईकर, महेंद्र शहारे आदी उपस्थित होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply