Breaking News

झोतिरपाडा ग्रामपंचायतीच्या सदस्यांना दिलासा; पदावरून काढण्याच्या आदेशाला स्थगिती

पाली : प्रतिनिधी
पेण तालुक्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या झोतिरपाडा ग्रामपंचायतीच्या सर्व 11 सदस्यांना विभागीय आयुक्त यांच्या आदेशाने पदावरून काढून टाकण्याचे निर्गमित करण्यात आले होते, मात्र या सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोकण विभागीय आयुक्तांच्या आदेशाला ग्रामविकास मंत्रालयाने स्थगिती दिलेली आहे.
तक्रारदार माजी सरपंच ज्योती दत्ताराम तरे यांनी झोतिरपाडा ग्रामपंचायतीच्या 11 सदस्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी ग्रामपंचायत सदस्य नरेश काशिनाथ पाटील, प्रसाद नारायण कुथे, दिनेश गणपत कुथे, कोमल अनिल कुथे, प्रणाली जयेश पाटील, विश्वनाथ हरिभाऊ उतेकर, रोहिणी दिनेश अल्हाट, रेखा नंदकिशोर साबळे, प्रणाली पुंडलिक कोळी, अक्षता सीताराम पाटील, शुभांगी दिनेश भोईर यांना पदावरून काढून टाकण्यात आल्याचे आदेश पारित केले होते.
कोकण विभागीय कोकण आयुक्तांच्या या आदेशाविरुद्ध नरेश काशिनाथ पाटील व अन्य नऊ सदस्यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 39 (03)नुसार ग्रामविकास मंत्रालयात अपील दाखल केले होते. ग्रामविकास मंत्रालयाने कोकण विभागीय आयुक्त यांनी पारित केलेल्या आदेशाला स्थागिती दिली आहे तसेच या प्रकरणाच्या पुढील सुनावणीची तारीख लवकरच कळवण्यात येईल, असे राज्य शासनाच्या अवर सचिव नीला रानडे यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे झोतिरपाडा ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना तूर्त दिलासा मिळाला आहे.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply