उत्तरकाशी : वृत्तसंस्था
उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बोगद्यात अडकलेल्या मजुरांची अखेर सुटका करण्यात आली आहे. या बोगद्यात 41 कामगार अडकले होते. त्यांची 17 दिवसांनी मंगळवारी (दि.28) सुटका करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला, तर संपूर्ण देशभरात आनंद व्यक्त करण्यात आला.
गेल्या 12 नोव्हेंबरपासून उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यात तब्बल 41 कामगार बोगद्यात अडकून पडले होते. तेव्हापासून या कामगारांच्या सुटकेसाठी दिवसरात्र रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. देशासह जगाच्या नजरा याकडे लागल्या होत्या. तब्बल 17 दिवसांनी या 41 कामगारांना बाहेर काढण्यात आले.
कामगारांच्या सुटकेसाठी विविध यंत्रणा उत्तराखंडमध्ये एकवटल्या होत्या. प्रचंड कष्ट, अत्याधुनिक यंत्रणांच्या मदतीने या कामगारांसाठी अन्न-पाणी, मोबाईल, तणाव कमी करण्यासाठीच्या वस्तू पाठवण्यात आल्या होत्या. शेवटी बोगद्यापाशी अँब्युलन्स तयार ठेवण्यात आल्या होत्या तसेच कामगारांच्या वैद्यकीय तपासणीसाठी बांधकामाच्या ठिकाणीच तात्पुरत्या रुग्णालयाची सोय करण्यात आली होती. कामगार बाहेर येताच सर्वांनी आनंद व्यक्त केला.
उत्तरकाशीतील कामगार बांधवांच्या बचावकार्याचे यश सर्वांनाच भावूक करीत आहे. बोगद्यात राहिलेल्या मी सांगू इच्छितो की तुमचे धैर्य आणि संयम सर्वांना प्रेरणा देत आहे. मी तुम्हा सर्वांना चांगले आरोग्य इच्छितो. या बचावकार्याशी संबंधित सर्व लोकांच्या उत्साहाला मी सलाम करतो. त्यांच्या शौर्याने व जिद्दीने कामगार बांधवांना नवसंजीवनी दिली आहे. प्रत्येकाने माणुसकी, टीमवर्कचे अद्भूत उदाहरण ठेवले आहे. -नरेंद्र मोदी, पंतप्रधान
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …