Breaking News

स्वखर्चातून कोविड लसीकरण शिबिर

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून नगरसेवक मनोज भुजबळ यांचे कौतुक

पनवेल : वार्ताहर

भाजपच्या ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, तसेच उत्कर्ष कला व क्रीडा मंडळ यांच्या विद्यमाने लसीकरण शिबिर ठेवण्यात आले. यामध्ये कोविशिल्ड लसीचा 18 वर्षावरील व्यक्तींना दुसरा डोस स्वतःच्या खर्चाने देण्यासाठी हे शिबिर आयोजित केले होते. असेच उपक्रम ते भविष्यातही त्यांच्या माध्यमातून सुरू राहतील, अशी अपेक्षा आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 6) या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

अ‍ॅड. मनोज भुजबळ आणि उत्कर्ष कला व क्रीडा मंडळाने बिरमोळे हॉस्पिटलच्या मदतीने सोमवारी नवीन पनवेल पोदी शाळा सेक्टर 15 ए मध्ये शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, नगरसेवक मनोज भुजबळ, बिरमोळे हॉस्पिटलचे डॉक्टर बिरमोळे, उत्कर्ष कला व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राकेश भुजबळ , प्रशांत फुलपगार (सचिव भाजप), जयेश ठाकूर, रवींद्र फुलपगार, किशोर शिंदे, क्रांती चितळे, यतिन पाटील उपस्थित होते. 

अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी या वेळी आम्ही 350 जणांना जून महिन्यात यशोधन सोसायटी, भागीरथी सोसायटी, चंद्रभागा सोसायटी, भुजबळ वाडीतील रहिवासी व उत्कर्ष कला व क्रीडा मंडळ यांच्या सहकार्याने पहिला डोस दिला होता. त्यामध्ये 50 पत्रकारांची कुटुंब होती. यासाठी आम्हाला लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर, माजी उपमहापौर चारुशीला घरात यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यातून प्रेरणा घेऊन कोविडमध्ये लोकांचे प्राण वाचवण्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून आम्ही हा उपक्रम राबवित असल्याचे सांगितले.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply