पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोळी बांधवांनी आपली संस्कृती अजूनही जपून ठेवली असून पनवेल कोळीवाडा ही येथील शान आहे, असे गौरवोेद्गार पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 19) नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमावेळी काढले.
कोळी समाजात नारळी पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा सण पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. यानिमित्ताने पनवेल कोळीवाड्याच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन केले गेले होते.
कोळी लोक सागराला नारळ अर्पण करून मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात करतात. त्यानुसार सोन्याचा मुलामा दिलेला नारळ माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते दर्याला अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांना परेश ठाकूर व इतर मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते राकेश पोटे, दत्ता पाटील, हारु भगत, गणेश भगत, आदेश ठाकूर यांच्यासह पंच कमिटीचे सदस्य आणि कोळी बांधव, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …