Breaking News

वणवे लागू लागले; वन विभागाचे मात्र दुर्लक्ष; शिरसे टेकडी जळून खाक

कर्जत : बातमीदार

वणवा लागल्याने कर्जतजवळील शिरसे टेकडी रविवारी (दि. 26) जाळून खाक झाली. दरम्यान, तीन तास हा वणवा भडकत असताना स्थानिकांनी फोनद्वारे माहिती देऊनही वन कमर्चारी घटनास्थळी पोहचले नाहीत. कर्जत तालुक्यात कृषिरत्न शेखर भडसावळे यांच्या माध्यमातून सगुणा वन संवर्धन पथकाकडून वणवे रोखण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून काम सुरू आहे. सगुणा वन संवर्धन पथकाने केलेल्या नियोजनबद्ध कामामुळे नेरळ, तसेच माथेरानच्या जंगलातील वणवे रोखण्यात यश आले आहे, मात्र कर्जत तालुक्यातील अन्य भागातील वणवे रोखण्यात वनविभागाला अपयश आल्याचे दिसून येत आहे. गवत सुकण्यास सुरुवात झाली असून लागलीच कर्जत तालुक्यात वणवे लागण्यास सुरुवात झाली आहे. कर्जत शहराजवळील शिरसे येथील टेकडीवर रविवारी सायंकाळी साडेसहा सात वाजता वणवा लागला. त्यानंतर तब्बल तीन तास तेथील डोंगर जळत होता. त्या काळात स्थानिक तरुणांनी वन विभागाला फोनद्वारे लागलेल्या वणव्याबद्दल माहिती दिली, मात्र संपूर्ण टेकडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली तरी वन कर्मचारी तेथे पोहचले नव्हते. ही टेकडी वन विभागाच्या मालकीची असून वन विभाग गेल्या काही वर्षापासून तेथे सातत्याने वृक्षारोपण करीत आहे, मात्र या ठिकाणी जाळरेषा काढून वणवे रोखण्याचे काम वन विभागाने केले नाही. त्यामुळे गवताबरोबर तेथील झाडेदेखील आगीच्या भक्ष्यस्थानी आली आहेत. या भागातील आकुर्ले येथील टेकडी वणव्याने जळल्यानंतर दुसर्‍या दिवशी तेथून एक किलोमीटर आत असलेल्या शिरसे टेकडीला वणवा लागतो, ही बाब काहीशी संशय निर्माण करणारी असून वन विभागाच्या दुर्लक्षपणामुळे शिरसे टेकडी आगीच्या भक्षस्थानी आली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply