Breaking News

भाजप नेते धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर

मुंबई ः प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने महाराष्ट्रातून दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष व माजी आमदार धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. पाटील यांनी मागील वर्षी शेकापतून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
भाजपने राज्यसभेसाठी नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात आसामधून मिशनरंजन दास, रामेश्वर तेली, बिहारमधून मनन कुमार मिश्र, हरियाणामधून किरण चौधरी, मध्य प्रदेशमधून जॉर्ज कुरियन, महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील, ओडिसा येथून ममता मेहंता, राजस्थानमधून सरदार रवनीत सिंह बिट्टू, त्रिपुरा येथून राजीब भट्टाचार्जी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्यसभेच्या 12 रिक्त जागांसाठी 3 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे.

Check Also

भव्य कटआऊट्स; चित्रपटाचं मोठेपण त्यातही

आज सगळीकडेच लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘छावा’ची जबरदस्त क्रेझ आहे. चित्रपट शौकिनांपासून इतिहासाचे अभ्यासक आपापल्या पद्धतीनुसार …

Leave a Reply