Breaking News

रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या

मुंबई ः प्रतिनिधी

वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या तीन वरिष्ठ विद्यार्थिनींकडून होणार्‍या रॅगिंगला कंटाळून जळगावच्या पायल तडवी या दुसर्‍या वर्षात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीने मुंबईच्या नायर रुग्णालयातील कॉलेज हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. काल सकाळी पायलचा मृतदेह जळगावमध्ये आणण्यात आला. या वेळी संतप्त नातेवाइकांनी तिचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात नेला. दोषींना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. 

पायल तडवी (23) हिने मुंबईच्या नायर रुग्णालयातील कॉलेज हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. तीन वरिष्ठ विद्यार्थिनींकडून होणार्‍या रॅगिंगला कंटाळून तिने आत्महत्येचे पाऊल उचलले, असा आरोप करीत पायलच्या नातेवाइकांनी तक्रार नोंदवली. या प्रकरणी तिघींविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. काल सकाळी पायलचा मृतदेह जळगावात आणण्यात आला. संतप्त नातेवाइकांनी तिचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात नेला. या प्रकरणातील दोषींना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे.

– वरिष्ठांकडून मानसिक छळ

पायलच्या आई आबिदा या जळगावहून मुंबईत नायर रुग्णालयात आल्या होत्या. त्यांनी सांगितलं की, मी जेव्हा रुग्णालयात आले त्यावेळी तीन डॉक्टर महिलांनी पायलला भेटू दिले नाही. बुधवारी तिने मला फोन केला आणि रडायला लागली. तीन वरिष्ठ डॉक्टरांकडून माझा मानसिक छळ होत आहे, असे ती सांगत होती.

– जातीवरून अपमान पायलच्या नातेवाइकांनी सांगितलं की, पायलच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील संवादाचे पुरावे आम्ही पोलिसांकडे दिले आहेत. तीन वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून तिचा सातत्याने जातीवरून अपमान केला जात असे.नायर रुग्णालयाच्या व्यवस्थापन विभागातील वरिष्ठांनी यासंबंधी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेबाबत ऐकून धक्का बसला. पायलने याबाबत शिक्षक किंवा रॅगिंगविरोधी समितीकडे कोणतीही तक्रार केली नाही. आम्ही हे प्रकरण पोलिसांकडे सोपवले आहे. रॅगिंगविरोधी समिती या प्रकरणी तपास करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply