भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात सुमारे एक कोटी 30 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ मंगळवारी (दि. 24) झाला. या कामांचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. ही सर्व कामे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विविध निधींमधून करण्यात येणार आहेत.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघात अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. त्यानुसार त्यांच्या माध्यमातून 20 लाख रुपयांच्या निधीमधून मालडुंगे ग्रामपंचायतीमधील सतिचीवाडी येथे जोडरस्ता, 10 लाख रुपयांच्या निधीमधून कोंबलटेकडी येथे सामाजिक सभागृह, 10 लाख रुपयांच्या निधीतून वाघाचीवाडी येथे सामाजिक सभागृह, 10 लाख 29 हजार रुपयांच्या निधीतून वाघाचीवाडीकडे जाणारा रस्ता, 18 लाख रुपयांच्या निधीतून धोदाणी येथे साकव, आठ लाख रुपयांच्या निधीतून धोदाणी येथे विष्णू यांच्या घरापासून ते नामदेव चौधरी यांच्या घरापर्यंत रस्ता, आठ लाख रुपयांच्या निधीतून धोदाणी बसस्टॉप ते बाळाराम भगत यांच्या घरापर्यंत रस्ता, आठ लाख रुपयांच्या निधीतून बाळा चौधरी यांच्या घरापासून पद्माकर चौधरी यांच्या घरापर्यंत रस्ता, 10 लाख रुपयांच्या निधीतून वाजे ग्रामपंचायतीमधील देविराज कॉलनीकडे जाणारा रस्ता, 10 लाख रुपयांच्या निधीतून वाजे येथे विसर्जन घाट, आठ लाख रुपयांच्या निधीतून वाजे येथे विठ्ठल पाटील ते गणपत मदने यांच्या घरापर्यंत रस्ता तसेच 10 लाख रुपयांच्या निधीमधून सांगटोली पेरुचीवाडी जाणरा रस्ता तयार करण्यात येणार आहे. या विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमांना भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, सुनील पाटील, विश्वजीत पाटील, राजा भोईर, मालडुंगेचे सरपंच सीताराम चौधरी, रोशन पाटील, रवींद्र भालेकर, श्याम भालेकर, रूपेश भोईर, गणपत पाटील, अंबाजी पाटील, योगेश पाटील, शशिकांत भगत, मेघनाथ भगत, पदू वाघ, हर्षदा चौधरी, उपसरपंच जनार्दन निरगुडा, अर्जुन कांबडी, उषा वारगडा, काळुराम वाघ, जोमा निरगुडा, गणपत वारगडा, कमल्या कांबडी, सीताराम कांबडी, कानू हाशाविर, दिलीप पाटील, महादू सांबरी, राघो भस्मा, शनिवार खंडवी, माई खंडवी, राजू वाघ, विष्णू पारधी, ताई भस्मा, कमळू चौधरी, लक्ष्मण चौधरी, संतोष भगत, बाळाराम भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.