तळोजा ः रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना विजयी केले आहे. आमदारांनीही तो विश्वास सार्थ केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीतही त्यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन भाजपचे गोवा प्रदेश महामंत्री, माजी आमदार दयानंद सोपटे यांनी तळोजा येथे महिलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.
महाराष्ट्रातील भगिनींसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर महिलांकडून सरकारच्या या योजनेचे स्वागत केले जात आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल विधानसभा क्षेत्रातील सर्वच महिला भगिनींसाठी खेळ पैठणीचा आणि लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत सोमवारी (दि. 7) तळोजा येथे हा कार्यक्रम झाला. त्या वेळी सोपटे बोलत होते.
या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, संध्या शरबिद्रे, प्रतिभा भोईर, शिल्पा म्हात्रे, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष कमला देशेकर, दिनेश खानावकर, प्रकाश खैरे, गोनीनाथशेठ पाटील, निर्दोष केणी, सागर मोरे, नितीन भोर्ईर, रमेश मढवी, प्रतीक्षा केणी, विजश्री पाटील, समीना साठी, अमृत पाटील, सविता फडके, उज्वला साळुंखे, नंदू म्हात्रे, आशा बोरसे, संतोष पाटील, राम पाटील, कृष्णा पाटील, लीना म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या वेळी महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उषा म्हात्रे, चंद्रभागा पाटील, कोमल कदम, मनीषा शेगर, जागृती सांगळे, गंगादेवी, प्राप्ती शेलार, अचल मढवी, देवई महानवर, रूपाली पाटील या विजयी झाल्या. त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …