Breaking News

मौज-मजेसाठी चोरी करणार्या दोन जणांना अटक

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल शहर पोलिसांनी मौजेमजेसाठी मोटरसायकल आणि ऑटो रिक्षा चोरणार्‍या दोन आरोपींना अटक करून चार मोटरसायकल, चार ऑटो रिक्षा असा चार लाख 30 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल आणि ऑटो रिक्षा चोरीच्या घटना घडत असल्याने पोलीस आयुक्त संजयकुमार, सह आयुक्त राजकुमार व्हटकर, उपायुक्त अशोक दुधे, सहाय्यक आयुक्त रवींद्र गिड्डे यांचे सुचनेनुसार पनवेल शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश रजपूत, उप निरीक्षक सुनील तारमळे व त्यांच्या सहकार्‍यांनी खबर्‍यांकडून मिळालेल्या व तांत्रिक माहितीच्या आधारे अशोक उताले, पंचशील झोपडपट्टी, नवीन पनवेल व अभिषेक बोराडे उर्फ बटक्या यास तुर्भे एमआयडीसी येथून अटक करून चार मोटरसायकल, चार ऑटो रिक्षा, सिगारेट  व तंबाखू असा चार लाख 30 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी हे मौजेमजेसाठी मोटरसायकल आणि ऑटो रिक्षा चोरून पेट्रोल संपल्यावर सोडून देत असत. त्यांनी तक्का परिसरात पानटपरीचे लॉक तोडून सिगारेट आणि तंबाखूची चोरी केली होती. त्यांच्याकडून पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आठ, कळंबोली आणि तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला आहे. त्यांना 30 जुलैपर्यंत न्यायालयाने  पोलीस कोठडी दिली आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश रजपूत, उप निरीक्षक सुनील तारमळे, हवालदार विजय आयरे, नितिन वाघमारे, नाईक प्रमोद शिंदे, पंकज पवार, नंदकुमार माने, गणेश चौधरी, आमरदीप वाघमारे,  शिपाई म्हाळू आव्हाड, विवेक पारासुर, यादवराव घुले, राजू खेडकर व सुनील गर्द्नमारे करीत आहेत.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply