विविध रस्त्यांच्या कामाचेही होणार भूमिपूजन
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील विचुंबे गावाजवळ गाढी नदीवर उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. 9) सायंकाळी 4 वाजता होणार आहे.
या कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
या पुलासाठी कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर व सहकार्यांनी प्रयत्न व पाठपुरावा केला होता. त्यानुसार मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मान्यता देत काम पूर्णत्वास नेले आहे. या पुलामुळे नवीन पनवेल ते विचुंबे, पाली देवद, उसर्ली, शिवकर, मोहो पाली असा प्रवास करणार्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या पुलाच्या लोकर्पणासह विचुंबे अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण, विचुंबे पोलीस चौकी ते सारनाथ बुद्धविहारकडे तसेच बौद्धवाडा ते ग्रीन व्हॅलीपर्यंत जाणार्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनसुद्धा होणार आहे.