खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात ‘क्षितिज’ या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याचे आयोजन मंगळवारी (दि. 19) करण्यात आले होते. हा सोहळा संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना या वेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
या सोहळ्याला संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘अ’चे अध्यक्ष अभिमन्यू पाटील, नगरसेवक नीलेश बावीस्कर, नगरसेविका नेत्रा पाटील, अनिता पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, तळोजा विभागीय अध्यक्ष प्रभाकर जोशी, कैलास म्हात्रे, संस्थेचे सचिव एस. टी. गडदे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. लोकनेते रामशेठ ठाकूर आणि वाय. टी. देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना मार्गदर्शन केले.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते परीक्षा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामिगिरी करणार्या विद्यार्थ्यांना या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले; तर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.