Breaking News

‘कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क लावणे, वारंवार हात धुणे अनिवार्य’

पनवेल : प्रतिनिधी

कोरोना हा जास्तीत जास्त ड्रॉपलेटमधून पसरू शकतो, तसेच आपण मास्क लावणे, हात वारंवार हॅण्डवॉशने धुणे, या गोष्टींचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे असे टाटा हॉस्पिटलचे, हेल्थ फिजिशियन, डॉक्टर निलेश कांबळे यांनी श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन, नवीन पनवेलच्या कॉफी आणि बरंच काही… सीझन तीन या कार्यक्रमात ऑनलाइन मार्गदर्शन

करताना सांगितले.

गुरुवार 16 जुलै  रोजी, संध्याकाळी 5  वाजता श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन, नवीन पनवेलच्या  कॉफी  आणि बरंच काही…सीझन तीन या कार्यक्रमात, कोविड-19 वर प्रतिबंधक उपाय व घ्यावयाची काळजी’ या विषयावर ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते मुंबईच्या टाटा हॉस्पिटलचे डॉ. निलेश कांबळे, आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराजजी विसपुते, संचालिका संगिता विसपुते, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा कांबळे, सर्व स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.

जीवन खुप सुंदर आहे, पण ते जगत असतांना येणार्‍या प्रसंगाना सकारात्मक दृष्टिने खंबीरपणे तोंड देणे हीच जीवनाची खरी वाटचाल आहे. अशा सकारात्मक विचारांची पेरणी करत मानवी मनावर आलेल्या ताणतणावाचे नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन करताना डॉ.निलेश कांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांचे व समस्यांचे निराकरण केले. आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन,धनराजजी विसपुते यांनी, काळ जरी कठीण असला तरी आपण त्यावर आपण मात करू शकतो, या समस्येतूनच संधी निर्माण होतात, त्यामुळे खचून न जाता आपण याही काळात मार्गक्रमण केले पाहिजे असे सांगत सर्वांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन निर्माण केला.

त्या नंतर चित्रफितीच्या माध्यमातुन कोविड-19 संदर्भात जाणीवजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगती जाधव यांनी केले तर डॉ. छाया शिरसाट यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply