नवी मुंबई : प्रतिनिधी
बेलापूर विधानसभा मतदारसंघातील शिरवणे गाव येथे दोन दिवसीय भव्य कॅरम स्पर्धा झाली. भाजपचे महामंत्री डॉ. राजेश पाटील आणि माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांच्यातर्फे आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत देशाच्या विविध भागातील खेळाडू सहभागी झाले होते. मालदीव येथे झालेल्या जागतिक कॅरम स्पर्धेतील चॅम्पियन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील व दिव्यांग खेळाडूंनीसुद्धा स्पर्धेत
सहभाग नोंदविला. भाजपचे डॉ. पाटील, काशिनाथ पाटील, माजी नगरसेविका माधुरी सुतार यांनी खेळाडूंना मुलांना प्रोत्साहन दिले.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …