Breaking News

जेएनपीटीमध्ये वायू गुणवत्ता नियंत्रण केंद्राची स्थापना

मुंबई : रामप्रहर वृत्त

भारताचे नंबर एकचे पोर्ट असलेल्या जेएनपीटीमध्ये पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी बंदराचे सर्व कर्मचारी, तसेच पोर्ट युजर्स यांना पर्यावरणाविषयी शपथ देऊन नंतर प्रशासकीय इमारतीजवळ वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जेएनपीटी आवारात शाश्वत विकास आणि पर्यावरणाच्या सवांदाचा भाग म्हणून वायू गुणवत्ता नियंत्रण केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्रातून रिअल टाइम आधारावर, पोर्ट एरियामधील वायू गुणवत्ता, प्रदूषण पातळी आणि इतर संबंधित मापदंडांचे परीक्षण करण्यात येणार आहे.

याविषयी बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले की, जेएनपीटीमध्ये आम्ही सतत पर्यावरणाला अनुकूल पर्याय शोधत असतो, ग्रीन पोर्ट बनण्याच्या प्रयत्नात अनेक पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. निरोगी आयुष्यासाठी गुणवत्तायुक्त हवा आणि पाणी हे महत्त्वाचे घटक आहेत आणि म्हणूनच पोर्ट म्हणून आम्ही हवेच्या शुद्धतेवर बारकाईने तपासणी करीत आहोत आणि ती शुद्धता कायम ठेवण्यासाठी वेळेवर उपाय करण्यात येत आहेत. या केंद्रामध्ये सुसज्ज नेटवर्कसह पोर्टवरील विविध ठिकाणी अनेक मोबाईल सेन्सर आणि स्थिर सेन्सर असणार आहेत. हे सेन्सर्स प्रत्येक सेकंदाला एकाच वेळी रिझोल्यूशनमध्ये हवामानविषयक विविध घातक स्तराच्या मापदंडांचे परीक्षण करतील. सेन्सरद्वारे संग्रहित केलेल्या घटकांचे रिअल टाइम बेसिसवर विश्लेषण केले जाईल आणि डिजिटल बोर्डवर प्रदर्शित करण्यात येईल. यात भर म्हणून कालांतराने जमा केलेली माहिती वातावरणासंबंधित उत्तम संग्रह असेल. ज्यामुळे पर्यावरणाच्या परिणामाच्या विविध कलाविषयी आपल्याला अधिक माहिती मिळू शकेल. एअर क्वालिटी इंडेक्स अंदाजांसाठी एक तज्ज्ञ प्रणालीदेखील विकसित करण्यात येणार असून, ज्यामुळे अत्याधुनिक ऑनलाईन मॉनिटरिंग स्टेशनकडून एकत्रित सेन्सर नेटवर्कसह मिळणारा रिअल टाइम एअर गुणवत्ता डेटा वापरता येणार आहे. हे केंद्राचे संचालन आणि देखरेख भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास यांच्याद्वारे करण्यात येणार आहे.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply