Breaking News

वांजळे तलाव गाळमुक्त करण्यासाठी तरुणांचा पुढाकार

श्रमदानातून तलावाची साफसफाई

कडाव ः वार्ताहर : सध्या सर्वत्र भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या लक्षात घेता कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत हद्दीतील वांजळे येथील गावतलाव गाळमुक्त करण्यासाठी व पाण्याची पातळी वाढविण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला आहे. कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप ठाकरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून श्रमदानातून तलावाचा गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी परिसरातील तरुणवर्गासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

3 मे रोजी सकाळी साडेदहा वाजता तलावाचा गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आली. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत गाळ काढून झाला. गाळ काढण्यास गावातील नागरिकांनीही तरुणांना मदत केली. या समाजिक कार्यात किरवलीचे सरपंच दत्तात्रेय सांबरी, उपसरपंच बिपिन बडेकर, ग्रामविकास अधिकारी पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्रद्धा शेळके, सामाजिक कार्यकर्ते संदीप बडेकर, विनोद बडेकर, हितेश भोईर, गणेश भोईर, तुषार ठाकरे, सागर हाडप, उत्तम ठाकरे, राज भोईर, रोहित ठाकरे, पीयूष ठाकरे आदींनी सहभाग घेतला.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply