खालापूर : प्रतिनिधी
मुंबई – पुणे महामार्गावरील कलोते (ता. खालापूर) गावाच्या हद्दीत स्वयंपाकाचा गॅस वाहून नेणारा टँकर शनिवारी (दि. 15) सकाळी निसरड्या रस्त्यावरुन घसरला व महामार्गावर आडवा झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. मात्र कलोते गावाजवळ काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. इंडेन कंपनीचा स्वयंपाकाचा गॅस वाहून नेणारा टँकर (एम.एच.48,एवाय-4723) मुंबई-पुणे महामार्गावरून शनिवारी सकाळी खोपोलीकडे जात होता. कलोते गावाच्या हद्दीत पावसाच्या पाण्याने निसरडा झालेल्या रस्त्यावरून तो घसरला. व महामार्गाच्या मधेच आडवा झाला. या दरम्यान मार्गावर वाहने नसल्याने जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.