Breaking News

खालापुरात गॅसवाहक टँकर घसरला

खालापूर : प्रतिनिधी

मुंबई – पुणे महामार्गावरील कलोते (ता. खालापूर) गावाच्या हद्दीत स्वयंपाकाचा गॅस वाहून नेणारा टँकर शनिवारी (दि. 15) सकाळी निसरड्या रस्त्यावरुन घसरला व महामार्गावर आडवा झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. मात्र कलोते गावाजवळ काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.इंडेन कंपनीचा स्वयंपाकाचा गॅस वाहून नेणारा टँकर (एम.एच.48,एवाय-4723) मुंबई-पुणे महामार्गावरून शनिवारी सकाळी खोपोलीकडे जात होता. कलोते गावाच्या हद्दीत पावसाच्या पाण्याने निसरडा झालेल्या रस्त्यावरून तो घसरला. व महामार्गाच्या मधेच आडवा झाला. या दरम्यान मार्गावर वाहने नसल्याने  जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.

Check Also

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला आमदार प्रशांत ठाकूर यांचे जोरदार समर्थन

विधीमंडळ सभागृहात जाहीर केला पाठिंबा मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यात जबदस्तीने किंवा प्रलोभनाव्दारे धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने …

Leave a Reply