Breaking News

राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवत शनिवारी (दि. 6) साजरा झाला. वाढसिवसानिमित्त अजिवली येथील जनता माध्यमिक व उपमाध्यमिक विद्यालयात नवीन वर्ग खोलीचे भूमीपूजन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, शालेय विद्यार्थ्यांना वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते.

भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त आजिवली येथील जनता माध्यमिक व उपमाध्यमिक विद्यालयात नवीन वर्ग खोलीचे भूमीपूजन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शालेय विद्यार्थ्यांना वह्यावाटप त्याचबरोबर मुलींसाठी सेमनेटरी नॅपकींग वेंडिग मशीन भेट देण्यात आली. या कार्यक्रमांना भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक प्रविण पाटील, पंचायत समिती उपसभापती वसंत काठावले, सभापती मनोहर म्हात्रे, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, ज्येष्ठ कार्यकर्ते ज्ञानेश्वर बागीत, कोन पंचायत समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, कोन सरपंच निलेश म्हात्रे, चिखले सरपंच नामदेव पाटील, बेळवली सरपंच बबन पवार, कोन पंचायतत समिती युवा मोर्चा अध्यक्ष संदेश पाटील, बोर्ले सदस्य घनश्याम पाटील, ट्रान्सपोर्ट सेल अध्यक्ष गणेश पाटील, युवा नेते हॅपी सिंग, हर्षवर्धन पाटील, विनोद साबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अनेक उपस्थित मान्यवरांनी राजेंद्र पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच युवानेते भास्कर मुंढे यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply