मुरूड : प्रतिनिधी
शालांत परीक्षा म्हणजे भविष्यातील कर्तृत्वाची दारे उघडून देणारा सोपान आहे. या परीक्षेत उत्तम प्राविण्य मिळविण्यासाठी वेळेला महत्त्व द्या, असे आवाहन विहूर येथील नचिकेताज हायस्कूलच्या संचालिका मुग्धा दांडेकर यांनी केले.
शालांत परीक्षेतील प्रविष्ठ असलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुरूड तालुक्यातील विहूर येथील नचिकेताज हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुग्धा दांडेकर बोलत होत्या. नीट परीक्षेत प्राविण्य मिळविल्याबद्दल हायस्कूलची माजी विद्यार्थीनी सुश्रीता दास हिचा यावेळी सत्कार करण्यात आला. सुश्रीता दास, माजी नगरसेवक मंगेश दांडेकर यांनी ही मनोगत व्यक्त केले.
अपेक्स कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे रिझवान उल्डे, तन्जीम कासकर, शाळेचे मुख्याध्यापक योगेश तंटक यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.