पेण : प्रतिनिधी
चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया (सीएफआय) रायगड युनिटतर्फे पेण तालुक्यातील वरवणे आदिवासीवाडीवर शारीरिक व सार्वजनिक स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात येऊन प्रतिपालीत व अप्रतिपालीत कुटुंबाना हायजिन कीटचे वाटप करण्यात आले.
सीएफआय या सामाजिक संस्थेतर्फे शिक्षण, आरोग्य, उदरनिर्वाहाचे साधन, निवारा व विविध समाजोपयोगी जनजागृती उपक्रम राबविले जातात. संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणात वरवणे आदिवासी वाडीतील ग्रामस्थ शारीरिक स्वच्छतेला विशेष महत्त्व देत नसल्याचे आढळून आले होते. त्यामुळे सीएफआयच्या समन्वयक वीणा दातार व समाजसेवक संदीप ढाकवळ यांनी तेथील आदिवासींना शारीरिक स्वच्छतेचे महत्त्व सांगून, स्वच्छतेसाठी आवश्यक वस्तूंचा वापर करण्याविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले व सीएफआयचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरवणे वाडीतील कुटुंबांना हायजीन कीटचे वाटप केले.