पनवेल शहराध्यक्षपदी सुरेखा कोळी
पनवेल : वार्ताहर
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात युवा राष्ट्रीय अध्यक्ष कनिष्क कांबळे यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निलीमा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर पनवेल शहराध्यक्षपदी सुरेखा कोळी यांची नियुक्ती करण्यात आली.
या वेळी युवा राष्ट्रीय अध्यक्ष कनिष्क कांबळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष हिरामण साळवी, महासचिव विलास साळवी, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष राजन सूर्यवंशी, रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित रायगड महिला आघाडी जिल्हाध्यक्ष निलीमा पवार यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. आगामी काळात महिलांची ताकद पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यात वाढविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन पक्षाच्या व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल, असे या वेळी नवनिर्वाचित अध्यक्षा निलीमा पवार यांनी सांगितले.