Breaking News

मोनिका महानवर यांच्या पाठपुराव्याला यश

ऑनलाइन क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती सभापती मोनिका महानवर व नगरसेविका प्रमिला पाटील यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील ध्यानमंदिर या शाळेला पालकांसमवेत जाऊन विविध मागण्यांसंदर्भात निवेदन दिले होते. त्यानुसार शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या फीमध्ये सवलत व ऑनलाइन क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे.

निवेदनात सन 2020-2021 व 2021-2022 या शैक्षणिक वर्षामधील विद्यार्थ्यांची फी कमी करण्याबाबत मागणी करण्यात आली होती. या पत्राद्वारे त्यांनी लोकांच्या फी संबधित समस्या त्यांचा समोर मांडल्या व पालकांच्या समस्यावरून ऑनलाइन क्लासेसला फी बाकी आहे म्हणून प्रवेश दिला जात नाही यालाही पूर्णपणे विरोध केला होता. तात्काळ ऑनलाइन क्लासला सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या सूचना शाळेला दिल्या होत्या.

कोरोनासारख्या भयानक महामारीमध्ये शैक्षणिक फी कमी करण्याच्या निवेदनामुळे शाळेने विशेष 30 ते 50 टक्क्यांपर्यंत फी माफ केली आहे. सभापतीच्या मागणीवरून सन 2020-2021 तसेच 2021-2022 या दोन्ही वर्षांमध्ये विशेष 40 टक्के सूट देण्यात आली आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे पालक कोरोनामध्ये मृत्यू पावले आहेत, अशा विद्यार्थ्यांना 50 टक्के सूट मिळावी अशी मागणी सभापतीनी केली होती त्यालाही शाळा प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला आहे.

कळंबोलीमधली पहिली शाळा ज्यांनी विद्यार्थी व पालक यांच्या समस्या लक्षात घेत सभापती यांच्या आंदोलनानंतर विशेष 30 ते 50 टक्के फी कमी केलेली आहे. या निर्णयाचे सर्व पालकांनी स्वागत केले आहे व शाळा प्रशासनाचेही सभापती मोनिका महानवर व युवा नेते रामदास महानवर यांनी शाळेमध्ये जाऊन प्राचार्यांचे आभार मानले.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply