Breaking News

श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयाची वृक्षदिंडी

गव्हाण : रामप्रहर वृत्त  – आषाढी एकादशीचे औचित्य साधून पर्यावरण रक्षणाचा जयघोष करीत विठूनामासोबत वृक्षसंवर्धनाचा गजर येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये करण्यात आला. येथील विद्यार्थी व रयत सेवकांनी काढलेल्या वृक्षदिंडीने कोपर व गव्हाण पंचक्रोशी दुमदुमली. वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासणार्‍या व पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी ढोल, ताशा व टाळ मृदंगाच्या गजरात काढलेल्या वृक्षदिंडीने सर्वांना आकर्षित केले.

सुरुवातीला विद्यालयाच्या प्रांगणात स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत व सदस्य अनंताशेठ ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मुख्याध्यापिका साधना डोईफोड व अन्य सेवकांच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आले. सांस्कृतिक विभागाने केलेल्या आटोपशीर नियोजनामुळे कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्धपणे साजरा झाला.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply