मुंबई : विविध घटकांच्या आरक्षणामुळे वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर प्रवेशाच्या जागांमध्ये खुल्या प्रवर्गाच्या कमी झालेल्या सर्व जागा अधिकच्या जागा वाढवून क्षती भरून काढण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ’सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’चळवळीच्या शिष्टमंडळाशी सह्याद्री अतिथीगृह येथे चर्चा करताना ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, या आरक्षणामुळे खुल्या गटातील ज्या पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश यंदा होऊ शकले नाहीत, त्यांनी खासगी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घ्यावा. त्यांच्या यंदाच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती सरकारतर्फे करण्यात येईल. या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव डॉ.संजय मुखर्जी, नेत्ररोग विशेषज्ञ तथा अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने व शिष्टमंडळाचे डॉ. संजय देशपांडे, डॉ. अनुप मरार, अनिल लद्धड आदी उपस्थित होते.
Check Also
पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …