Saturday , March 25 2023
Breaking News

गजल ग्रुपतर्फे ए. के. शेख यांचा पनवेलमध्ये सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त

येथील गजल ग्रुपतर्फे ज्येष्ठ गजलकार ए. के. शेख यांचा शनिवारी (दि. 13) सत्कार करण्यात आला. शेख सरांचा ‘गजलवेदना’ या गजलसंग्रहाचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या एमए (फर्स्ट पार्ट) मराठीच्या नवीन अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. याबद्दल त्यांचा सर्व स्तरातून सन्मान होत आहे. पनवेल येथील शासकीय बीएड कॉलेज येथे दर महिन्याला गजलकार ए. के. शेख गजलसाठीची कार्यशाळा घेतात. या कार्यशाळेतून कित्येक गजलकार आतापर्यंत तयार झाले आहेत. शनिवारी झालेल्या अशाच कार्यशाळेत त्यांच्या शिष्यांनी त्यांचा सत्कात आयोजित केला होता. या कार्यशाळेत सर्वांनी त्यांना दिलेल्या ओळीवर तरही गजल सादर केल्या. या वेळी ज्येष्ठ कवी, गजलकार रोहिदास पोटे, दिवाकर वैशंपायन, आबिद मुनशी, सदानंद रामधरणे, डॉ. अविनाश पाटील, प्रभाकर गोगटे, संदीप बोडके, संजीव शेट्ये, मीनल वसमतकर, पूजा नाखरे, रंजना करकरे आदी गजलकार, साहित्यिक उपस्थित होते.

Check Also

राहुल गांधी माफी मागा!.. भाजपचे पनवेलमध्ये आंदोलन; घोषणाबाजी करून निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल …

Leave a Reply