पोलादपूर : प्रतिनिधी
राज्यात 15 वर्षे मंत्री असताना ज्यांना कधी कुडपण दिसले नाही, ते सुनील तटकरे या भागाचा विकास काय करणार, असा सवाल आमदार भरत गोगावले यांनी केला.
पोलादपूर तालुक्यातील कुडपण, ओंबळी धनगरवाडी, मोरगिरी फौजदारवाडी येथील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 17) शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्या वेळी पोलादपूर शिवसेना संपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात आमदार गोगावले बोलत होते. या वेळी त्यांनी आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
ओंबळी धनगरवाडी येथील श्रीगणेश मित्रमंडळाच्या सदस्यांनी, तसेच मोतीराम कानू ढेबे, बेबीताई मोतीराम ढेबे, बाबू मोतीराम ढेबे, कांता बाबू ढेबे, बाळू बाबू ढेबे, सीताबाई बाळू ढेबे, विठ्ठल बाळू ढेबे, तुकाराम बाबू ढेबे, गंगुबाई तुकाराम ढेबे, कृष्णा तुकाराम ढेबे, जाणू धाकू ढेबे, लक्ष्मीबाई जानू ढेबे आदी ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार गोगावले यांनी त्यांचे स्वागत केले. मोरगिरी फौजदारवाडीतील काशिराम बाबाजी शिंदे, रोहिदास शिंदे, मारुती शिंदे, संजय शिंदे, प्रल्हाद शिंदे, संतोष शिंदे, प्रभाकर शिंदे, आनंद शिंदे, अंकुश शिंदे, प्रफुल्ल शिंदे, दीपक शिंदे, भास्कर शिंदे, चंद्रशेखर शिंदे, शैलेश शिंदे, विनायक शिंदे, विलास शिंदे, सुरेश शिंदे, सागर शिंदे आदी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. विभागप्रमुख सतीश शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी जि. प. सदस्य चंद्रकांत कळंबे, नगराध्यक्ष नीलेश सुतार, नगरसेवक नागेश पवार यांच्यासह सुभाष पवार, पद्माकर मोरे, नीलेश अहिरे, सुरेश पवार, मुरलीधर दरेकर, लक्ष्मण मोरे, सतीश शिंदे, किशोर जाधव, मंगेश नगरकर, अनिल मालुसरे, रवींद्र रामचंद्र चिकणे, प्रकाश गायकवाड, अनिल मालुसरे, नारायण साने, अनंता कुंभार, विजय मोरे, जगदीश महाडिक आदी पदाधिकारी उपस्थित होते.