Breaking News

टॅक्सीचालकांनी मानले आ. प्रशांत ठाकूर यांचे आभार

पनवेल : वार्ताहर

खारघर येथे टॅक्सी स्टॅण्ड उपलब्ध करून दिल्याबद्दल त्या भागातील टॅक्सीचालकांनी व सभासदांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर टॅक्सी स्टॅण्ड हायवे सेक्टर 2 लिटील मॉलसमोर हायवेलगत टॅक्सी स्टॅण्ड मंजूर करून दिला. त्याबद्दल शिवसेना माजी पनवेल उपमहानगरप्रमुख गुरुनाथ पाटील, तसेच टॅक्सीचालक व सभासदांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली व सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. या सर्वांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचीही भेट घेऊन त्यांना धन्यवाद दिले आहेत.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply