Breaking News

सीकेटी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

पनवेल ः रामप्रहर वृत्त

खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर महाविद्यालयामध्ये डॉ. सी. डी. देशमुख सेंटर फॉर अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव सर्व्हिसेस व अमरदीप बालविकास फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन गुरुवारी (दि. 18) करण्यात आले होते. हे सेमिनार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. खांदा कॉलनीमधील सीकेटी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी विविध उपक्रम, मार्गदर्शन सेमिनार, व्याख्यानमालांचे आयोजन करण्यात येत असते. त्याअंतर्गत डॉ. सी. डी. देशमुख सेंटर फॉर अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव सर्व्हिसेस व अमरदीप बालविकास फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सेमिनार घेण्यात आले. याचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ झाला. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, उपायुक्त जमीर लेंगरेकर, प्राचार्य डॉक्टर व्ही. डी. बर्‍हाटे, डॉ. एस. के.पाटील, उपप्राचार्य संजय हिरेमठ, बीएफ संस्थापक अध्यक्ष एन. टी. खान, ए. सचिव सलमा खान, नगरसेविका सीताताई पाटील, संजय भगत, कार्यक्रमाचे सूत्रसंचालक राजेश येवले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply