खालापूर : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील आडोशी आदिवासीवाडीत अळंबी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील पाच आदिवासींना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
रघुनाथ नथू वाघमारे (40), ठमी रघुनाथ वाघमारे (35), गणेश रघुनाथ वाघमारे (15), अंकुश रघुनाथ वाघमारे (9) व ललिता रघुनाथ वाघमारे (7) अशी विषबाधा झालेल्या आदिवासींची नावे आहेत. त्यांना शनिवारी (दि. 20) रात्री अळंबीतून विषबाधा झाली. या सर्वांना तातडीने खोपोली पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले.