भाजपसह परिसरातील नागरिकांचा सिडकोला इशारा
पनवेल : रामप्रहर वृत्त
सिडकोच्या नियोजन शुन्य काराभारामुळे कर्नाळा विभागातील नागरीकांना अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी येत नसल्याने त्यांचा आक्रोश वाढत आहे. वारंवार तक्रार करूनही ही समस्या सुटत नसल्याने शनिवारी (दि. 9) कर्नाळा नाका येथे सिडकोच्या माध्यमातून 18 गावांना ज्या पाईपलाईनमधून पाणीपुरवठा होतो त्याठिकाणी महिलांनी तीव्र आंदोलन करत पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर आत्मदहनाचा इशारा दिला.
कर्नाळा विभागातील नागरीकांना सिडकोच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येतो, मात्र सध्या परीस्थीतीत सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद करण्यात येतो. त्यामुळे या परिसरातील नागरीकांना तीव्र पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत असून, त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात उरणचे आमदार महेश बालदी यांनी सिडको अधिकर्यांसोबत चर्चा केली होती. त्यानंतर सुरळीत पाणी येऊ लागले होते, मात्र दोन दिवसांनतर पाणी पुरवठा परत कमी झाला. त्यामुळे कर्नाळा विभागातील महिलांनी आक्रमक भुमिका घेत जुना साईरोड वरील कर्नाळा नाका येथे महिलांनी आंदोलन केले. आंदोलन केल्यानंतर सिडकोच्या 18 गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार्या पाईपलाईनमधून पाणी पुरवठा सुरू केला, मात्र ग्रामस्थांनी पुढील काळात जर पाण्याची समस्येवर मार्ग काढला नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा सिडकोला दिला आहे.
या वेळी भाजपचे कर्नाळा विभागीय अध्यक्ष बाळूशेठ पाटील, जीवन टाकळे, गणेश सावंत, कमलाकर टाकळे, महिला उपाध्यक्षा टाकळे मॅडम उपस्थित होत्या.