Saturday , June 3 2023
Breaking News

उरणमध्ये गोल्डन शुगर कलिंगड दाखल

उरण : वार्ताहर

उन्हाचा तडाखा वाढण्यापूर्वी उरण बाजारात रोह्याचे गोल्डन शुगर गारेगार कलिंगड दाखल झाले असून नागरिक कलिंगड खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत.

कलिंगडाच्या हंगामाची सुरुवात जानेवारी महिन्यात होते. जून महिन्यापर्यंत हा हंगाम सुरू असतो. यंदा अवकाळी पावसामुळे यंदा कलिंगडाचा हंगाम काहीसा लांबणीवर पडला. त्यामुळे पुढील आठवड्यात कलिंगडाची आवक आणखी वाढेल. उन्हाळ्यात मागणी वाढत आहे. कलिंगडच्या आकारावरून किंमत ठरविली जाते. लहानांत लहान 100 रुपये तर मोठे आकाराचे 210 रुपये अश्या भावाने आम्ही विकतो, असे रोह्या तालुक्यातील तळाघर  येथील कलिंगड विक्रेते निशिकांत मधुकर गुरव यांनी सांगितले.

गडद हिरव्या रंगाची कलिंगड शुगर किंग, गोल्डन शुगर या नावाने ओळखले जातात. फ्रुट सलाड आणि ज्युस बनविण्यासाठी हि कलिंगडे मोठ्या प्रमाणात वापरली जातात. जसजसे तापमान वाढते तसतशी कलिंगडांना मागणी वाढत असल्याचे कलिंगड विक्रेती मुक्ता शशिकांत गुरव यांनी सांगितले.

उन्हाची काहिली वाढल्यावर कलिंगड आम्ही विकत घेतो. गोल्डन शुगर व शुगर किंग कलिंगड बाहेरून काळेभोर आणि गार लाल असणारी गोल्डन शुगर कलिंगडे नागरिकांना पसंतीत उतरतात.

-मधुकर पेडणेकर, ग्राहक, उरण

Check Also

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य …

Leave a Reply