Breaking News

पनवेलमध्ये स्तनपानाविषयी जनजागृती

पनवेलः बातमीदार

गरोदरपणात स्त्रियांच्या मनातील प्रश्न, त्यांच्या समस्या, या दिवसांमध्ये घ्यावयाची काळजी तसेच स्तनपानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी खारघर येथील मदरहूड रुग्णालयाच्या वतीने रविवारी (दि. 28) पनवेल येथे लिटील थिंग्स अबाऊट प्रेग्नन्सी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी पार पडलेल्या या शिबिरात जवळपास 50 जोडप्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या शिबिरांतर्गत गर्भधारणेचे विविध पैलू, बाळंतपण आणि पालकत्व तसेच पालक होताना अशा विविध विषयांवर चर्चात्मक संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत आहार तज्ज्ञांकडून गर्भवती स्त्रियांना मार्गदर्शन करण्यात आले असून यादरम्यान घ्यावयाचा सकस आहार, फिटनेस, गरोदरपणातील फॅशन, लेबर मॅनेजमेंट आदी विषयांवरही चर्चात्मक संवाद साधण्यात आला. या शिबिरात स्त्रीरोगतज्ज्ञ तसेच प्रसूतिशास्त्रज्ञ डॉ. अनू विज, डॉ. सपना चौधरी, डॉ. सुरभी सिध्दार्थ, फेटल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. प्रिया देशपांडे, आहारतज्ज्ञ मानसी जानी, ऍनेस्थेसिओलॉजिस्ट डॉ. अनिता रॉय यांनी गर्भारपणातील विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. स्तनपानाविषयीचे फायदे पटवून देण्याकरिता या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती खारघर येथील मदरहूड हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ आणि नियोनॅटोलॉजिस्ट डॉ. सुरेश बिराजदार यांनी दिली.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply