Breaking News

जिल्हा परिषद शाळा उलवेच्या व्यवस्थापन कमिटीच्या सभापतीपदी भाजपच्या शीतल सोमासे

उलवे ः जिल्हा परिषद शाळा उलवेच्या व्यवस्थापन कमिटीच्या सभापतीपदी भाजपच्या शीतल महेश सोमासे यांची बहुमताने निवड झाली, तसेच उपाध्यक्षपदी भाजपचे अनिल कुंभार हे विजयी झाले. त्याबद्दल भाजपचे ज्येष्ठ नेते एम. डी. खारकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या वेळी उलवे सरपंच कविता खारकर, उपसरपंच जगदीश खारकर, दिलीप कोळी, राजू खारकर, गणेश सोमासे, गायकवाड गुरुजी, समीर मढवी, उलवे नोड भाजप युवा मोर्चा अध्यक्ष निलेश खारकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply