Breaking News

रोह्यातील उर्दू शाळेत शालेय साहित्य वाटप

रोहा ः येथील नगरपालिकेच्या उर्दू शाळा क्रमांक 4 मधील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना अलईन्स टुर्स अ‍ॅण्ड ट्रायव्हर्सतर्फे मंगळवारी नगरसेवक जुबेर चोगले यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी अध्यक्ष अलिम मुमेर, मकबुल दर्जी, इमरान नुराजी, मुद्दसर खामकर, मुजीब खामकर, इरफान नुराजी, शादुल्ला नुराजी, सुलेमान नुराजी, मुख्याध्यापक कलाब, नजीर सर, मैमुन्ना मॅडम, रूबिना मॅडम, विनायक सकपाळ यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवेआगारमध्ये सागरी कासवाला जीवदान

श्रीवर्धन : तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी नायलॉनच्या जाळ्यात अडकलेल्या समुद्री कासवाला सोमवारी पुन्हा सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आले. दिवेआगर समुद्रकिनार्‍यावर सोमवारी (दि. 29) सकाळी जीवरक्षक गस्त घालत असताना समुद्री कासव नायलॉनच्या जाळ्यात अडकल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्वरित सरपंच बाळकृष्ण बापट व जीवरक्षक प्रितम भुसाणे, संतोष भाटकर यांना घटनास्थळी बोलावले. त्या सर्वांनी कासवाच्या पायात आणि मानेत अडकलेले नायलॉनचे जाळे सोडवून त्याला सुखरूप समुद्राच्या पाण्यात सोडले.

रोह्यात शिक्षक पालक सभा

रोहा : कोएसोच्या रोहे येथील मेहंदळे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात 23 ते 26 जुलै या चार दिवसांत पाचवी ते आठवीपर्यंतच्या शिक्षक-पालक सहविचार सभा झाल्या. या सभेत प्रत्येक इयत्तेचा शिक्षक-पालक संघ स्थापना करण्यात येऊन प्रत्येक इयत्तेतून एक महिला व एक पुरुष सदस्यांची निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या शिक्षक-पालक समितीमध्ये रिया मांजरेकर, डॉ. राजेंद्र जाधव, संपदा जोशी, योगेश राऊत, नेहा वाणी, राजेंद्र लाड, मनीषा साळवी, संतोष भोकटे यांचा समावेश आहे. प्राचार्य रमेश मोसे, नारायण पानसरे यांनी मार्गदर्शन केले. या सभेस शिक्षक आणि सुमारे 350 पालक उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply