Breaking News

सीकेटी विद्यालयात दीपपूजन उत्साहात

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त

नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर मराठी प्राथमिक विद्यालयात दीपपूजन उत्साहात साजरे करण्यात आले. या दिवसाला गटारी अमावास्या असेही म्हणतात. या अमावास्येच्या दुसर्‍या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होते.या वेळी मराठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर यांनी समई प्रज्वलित करून तिचे पूजन केले. या दीपपूजनाच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना दीपपूजनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. या दिवशी आपल्या घरातील सर्व दिवे स्वच्छ करून सांजवेळेला त्यांची पूजा करून प्रज्वलित करावे. त्यामुळे घरामध्ये प्रसन्नता निर्माण होते.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply