Breaking News

विद्यार्थ्यांनी पाहिले नौदलाचे जहाज ; एमएनएम विद्यालय व टीएनजी महाविद्यालयाची शैक्षणिक सहल

गव्हाण : प्रतिनिधी

कारगिल विजय दिवस महोत्सवानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या गव्हाण कोपर येथील एमएनएम विद्यालय व टीएनजी कनिष्ठ महाविद्यालयाची शैक्षणिक सहल नुकताच मुंबईतील नेव्हल डॉक यार्ड येथे आयोजित करण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी नौदलाच्या जहाजावर जाऊन ते जवळून पाहिले.

कारगिल विजय दिनास 20 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शहिदांना श्रद्धांजली अर्पण करीत नेव्ही वॉर शिप प्रदर्शन भरविण्यात आले होते. या वेळी भारतीय नौदलाच्या वतीने विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या  लढाऊ जहाजांची माहिती देण्यात आली.

विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर,  मुख्याध्यापिका नम्रता न्यूटन, पर्यवेक्षक अरुण जोशी, भरत जितेकर, तसेच शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून विद्यालयात विद्यार्थ्यांना मोलाची माहिती सांगितली.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply