Breaking News

पनवेल परिसरात विकासकामांचा धडाका

पनवेल : आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर, स्थायी सभापती मनोहर म्हात्रे यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिका हद्दीत विविध विकासकामांचा धडाका सुरु आहे. अनेक ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत विकासकामांची भूमिपूजने करण्यात आली. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पेंधरमध्ये स्वच्छतागृह

पेंधर गावातील नागरिकांसाठी  महानगरपालिका प्रभाग समिती (अ)चे सभापती अभिमन्यू धर्मा पाटील यांच्या हस्ते स्वच्छतागृहाचे उद्घाटनपर भूमिपूजन करण्यात आले. या वेळी नगरसेवक संतोष भोईर, काशिनाथ  पाटील, कोंडीराम भिवा नेरुळकर, काशिनाथ घरत आदी मान्यवरांसह दत्तात्रय भोईर, सोपान  नेरुळकर, राकेश नेरुळकर, डॉ. महेश फड, संतोष पाटील, भगवान भोईर, नितीन पाटील, अनिल पाटील, भगवान पाटील, हरेश पाटील, सचिन गणू कोपरकर, मोहन भोईर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

भोईरपाडा येथे स्वच्छतागृहाचे भूमिपूजन

तळोजा मजकूर येथील भोईरपाडा गावातील नागरिकांसाठी महानगरपालिका प्रभाग समिती (अ)चे सभापती अभिमन्यू पाटील यांच्या हस्ते स्वच्छतागृहाचे उद्घाटनपर पूजन करण्यात आले. या वेळी नगरसेवक  संतोष भोईर, नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील, नगरसेवक पापा पटेल, काशिनाथ घरत आदी मान्यवरांसह कैलास भोईर, बाबुराव भोईर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

घोट येथे स्वच्छतागृह

घोट गावातील नागरिकांसाठी महानगरपालिका प्रभाग समिती (अ)चे सभापती अभिमन्यू पाटील यांच्या हस्ते स्वच्छतागृहाचे उद्घाटनपर पूजन करण्यात आले. या वेळी नगरसेवक संतोष पाटील, नगरसेवक ज्ञानेश्वर  पाटील, काशिनाथ घरत आदी मान्यवरांसह संदीप धनाजी पाटील, वैभव चांगदेव भोईर, गोरखनाथ काळुराम पाटील, निखिल अशोक निगुळकर, प्रकाश पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

धरणा कॅम्पमध्ये स्वच्छतागृह

धरणा कॅम्प गावातील नागरिकांसाठी महानगरपालिका प्रभाग समिती (अ)चे सभापती अभिमन्यू पाटील यांच्या हस्ते स्वच्छतागृहाचे उद्घाटनपर पूजन करण्यात आले. या वेळी नगरसेवक संतोष भोईर, समीर कदम, प्रभाग अध्यक्ष नंदूशेठ म्हात्रे, शक्तिकेंद्र अध्यक्ष विश्वनाथ पाटील, शाखाप्रमुख  दत्ताराम पवार, काशिनाथ घरत आदी मान्यवरांसह मनोहर कदम, दीपक मालुसकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

शेकाप माजी नगरसेवक सुनील बहिराचा भाचा रूपेश पगडेच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या

महिलांना जबरी मारहाण व दमदाटी भोवली पनवेल : रामप्रहर वृत्त बांधकाम मटेरियल सप्लायवरून वाद करीत …

Leave a Reply