प्रेरक साहित्य लेखक शिवराज गोर्ले म्हणतात, समूहात काम करताना परस्परसंबंध हे कमी तणावाचे, सुरळीत ठेवावे लागतात. परस्पर संबंध हे विधायक, उत्पादक राहतील, परस्पर पूरक व परस्पर प्रेरक राहतील याची दक्षता घ्यावी लागते. ज्यांना हे समजतं तेच नेतृत्व करू शकतात. मग ते एखाद्या छोट्या गटाचं असो की संपूर्ण देशाचं! हे सारे पैलू यशासाठी मोलाचे ठरतात.
पनवेलचे सुसंस्कृत नागरिक, ज्येष्ठ नागरिक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या या पैलूबद्दल, व्यक्तिमत्त्वाबद्दल आदर व्यक्त करताना म्हणतात, महाराष्ट्राच्या विधानसभेतच नव्हे, तर मंत्रिमंडळात असावी अशीच ही व्यक्ती आहे. शांत, निगर्वी व सेवेच्या माध्यमातून लोकसेवा करणारे आमदार प्रशांत ठाकूर व त्यांचे कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे. मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले आहे. युवकांचे स्फूर्तिस्थान असलेले आमदार ठाकूर हे गरिबांचे कैवारी असून, सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे आहेत. मदतीचा हात देण्यासाठी ते नेहमीच अगे्रसर असतात. त्यांच्याकडे सामाजिक कार्य करण्याची धमक आहे. त्यांनी घेतलेला समाजसेवेचा वसा वाखाणण्याजोगा आहे. सध्याची वाढत जाणारी बेरोजगारी, तरुणांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची आणि सोडविण्याची क्षमता आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे आहे, तसेच एक माणूस म्हणूनही त्यांचे व्यक्तिमत्त्व आदरास पात्र आहे. आमदार प्रशांत ठाकूर म्हणजे पनवेलचे उमदे व्यक्तिमत्त्व. हाती घेतलेले कोणतेही काम पूर्ण करणारच. शिवाय ते तळागाळातल्या लोकांची सहानुभूतीपूर्वक जाण ठेवतात.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासारख्या व्यक्ती लोकांशी चटकन संवाद साधू शकतात. या व्यक्ती आपला मोठेपणा मिरवत नाहीत. स्वतःचे कौतुक त्या सांगत नाहीत. त्यांचा मोठेपणा त्यांच्या सहवासात येणार्यांच्या लक्षात येतो. आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासारखी साधेपणाने, नम्रतेने जगणारी, तसेच मनाने श्रीमंत असणारी माणसे क्वचितच भेटतात. सामान्यजनांना आमदार प्रशांत ठाकूर आपल्यातीलच वाटतात. प्रत्येकाला त्यांच्याशी नाते जोडावेसे वाटते. त्यांना लोकांचे प्रेम मिळते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात…
अभिमानाची स्वामिनी शांती
महत्त्व घेती सकळ
अभिमानापेक्षा शांत वृत्ती श्रेष्ठ आहे. या वृत्तीमुळे व्यक्तीला महत्त्व प्राप्त होते. सभोवतालचे लोक त्यांचे कौतुक करतात. स्तुती करतात. हा माणूस आदरणीय होतो. तीळमात्र अहंकार बाळगत नाही.
आमदार प्रशांत ठाकूर यांचे व्यक्तिमत्त्व साखरेप्रमाणे आहे. साखर जशी बाहेरून गोड असते तशी ते आतूनसुद्धा गोड असते. त्यांचे हृदय आणि वाणी दोहोत गोडवा आहे. मधुरता आहे. एक कवी म्हणतो….
बोलावे बहु गोड प्राण्या!
बोलावे बहु गोड!
अंतर बाहेर न बाधे साखर
सेवी सुखाची कोड प्राण्या…!
वाणीमध्ये गोडवा असेल, तर अपरिचित सुद्धा मित्र बनतात….
गैर अपने होंगे
शीरीं हो गर आपनी जबां।
हकीम लुकमान नेहमी म्हणत असत…
कम खाओ, गम खाओ और नम जाओ
मनशांत ठेवण्यासाठी मनुष्याने कमी खावे, समोरची व्यक्ती झगडा करणारी असेल, तर आपण शांत राहावे. तिसरी गोष्ट अहंकार नसावा, धनी व्यक्तीने मनाने सरळ असावे, नम्र असावे. महात्मा गांधीजी म्हणतात, आंब्याचे झाड जसजसे वाढत जाते तसतसे जमिनीकडे झुकत जाते. आंबे पिकल्यानंतर आंब्याचे झाड अतिशय झुकते. हे झुकणं त्याची नम्रता आहे. धनी व्यक्ती अशीच असते.
आमदार प्रशांत ठाकूर यांचे व्यक्तिमत्त्व फळांनी लगडलेल्या झाडांसारखे आहे. नम्रता हा त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे. ते स्वभावानं शांत आणि समजूतदार आहेत. या समजूतदारपणातूनच पनवेल व उरणकरांचे सहकार्य त्यांनी मिळविले आहे.
आमदार प्रशांत ठाकूर म्हणतात, आपल्या जीवनात स्वच्छतेचे अतिशय महत्त्व आहे. स्वच्छ परिसर, स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, स्वच्छ वातावरण प्रत्येकाला हवे असते. आरोग्य हेच धन अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. स्वच्छता, आरोग्य हे पैशापेक्षा मौल्यवान आहे.
आपल्या वाढदिवसाला महास्वच्छता अभियान राबवून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वच्छतेला नेहमीच प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हाती झाडू घेऊन न गंदगी करेंगे न करने देंगे असा मंत्र दिला. तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने स्वच्छता अभियान राबवले जात आहे.
महात्मा गांधी म्हणतात, जोपर्यंत माझे देशबांधव साफ-सफाई स्वच्छता शिकणार नाहीत तोपर्यंत त्यांच्यात प्रगती होणार नाही. सुसंस्कृत, सुस्थित, सुशिक्षित नागरिक आरोग्य आणि स्वच्छतेचे नियम जाणून घेतात व त्यांचे पालन करतात. ते म्हणतात, साफसफाईचे काम स्वतः करावे. हे काम करताना कोणत्याही प्रकारचा संकोच बाळगू नये.
लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर स्वच्छता अभियानाबाबत अतिशय आग्रही आहेत, तसेच सतर्क व सावध असतात. महात्मा गांधीजींचे स्वच्छ व निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचा, साकार करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
भव्य रोजगार मेळावा 2019च्या उद्घाटनप्रसंगी मेळाव्याचे आयोजक आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष देऊन स्कील इंडिया, स्टार्ट-अप इंडिया या महत्त्वाकांक्षी योजना देशाच्या प्रगतीला हातभार लावण्यासाठी आखल्या आहेत.
सेवा हेच सर्वात मोठे तप मानून आमदार प्रशांत ठाकूर दरवर्षी आरोग्य महाशिबिर आयोजित करतात. मुख्यमंत्री निधीतूनही ते रुग्णांना आर्थिक मदत करत असतात. ‘पहला सुख निरोगी काया’ हे जाणून त्यांनी आजपर्यंत हजारो रुग्णांना कोट्यवधी रुपयांची मदत केली आहे. निराधार, निराश्रित, ज्यांना निर्वाहाचे कुठलेच साधन नाही अशा बेघर झालेल्या झोपडपट्टीधारकांना, अशा 14 कुटुंबांना उत्कृष्ट दर्जाची घरे मिळणार आहेत ती फक्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे. गरीब व निराधार वृद्धांना आर्थिक मदत करण्याचे काम ते नेहमीच करतात. एक कवी म्हणतो…
आधार बन निराधारांसाठी
किनारा बन किनारा
नसणार्यांसाठी, स्वतःसाठी
जगणं ते काय जगणं,
जगायचंय तर लाखोंसाठी जगा
मा. आमदार प्रशांत ठाकूर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
-प्रा. डॉ. व्ही. एन. रणदिवे, पनवेल