पनवेल ः रामप्रहर वृत्त
भाजपमध्ये प्रवेश करणार्यांचा ओघ सातत्याने वाढत आहे. कर्जत तालुक्यातील वावलोली गु्रपग्रामपंचायतीमधील शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सीकेटी महाविद्यालयात रविवारी (दि. 4) झाला.
प्रकाश कांबेरे, अरुण कांबेरे, जनार्दन कांबेरे, अनिल मुंढे, दिलीप मुंढे, बलीराम मुंढे, संजय कांबेेरे, सुनील शेळके, मंगेश कांबेरे, रमेश मुंढे, देविदास मुंढे, विठ्ठल मुंढे, रूपेश मुंढे, सुनील मुंढे, जयेश मुंढे, प्रसाद मुंढे, राहुल मुंढे, उमेश मुंढे यांच्यासह अनेकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. याच वेळी खारघरमधील सामाजिक कार्यकर्ते मनोज पाटील, रेणुका चौहान, जस्मिना ठक्कर, युवराज गुप्ता, मधुरीता गुप्ता, अनिता शिंदे, लता फडतरे, सारंग फडतरे, श्रीमती शुभाजी, शिवराम सुतार, नरेंद्र कदम यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, चिटणीस रमेश मुंढे, पनवेल तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, चिटणीस पंकज मुंढे, खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, कीर्ती नवघरे, बिना गोगरी, गीता चौधरी, कर्जत शहर उपाध्यक्ष प्रकाश पालकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.