Wednesday , June 7 2023
Breaking News

उंबरखिंडीत विजय दिन उत्साहात      

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी

तालुक्यातील चावणी ग्रामपंचायत व ग्रामस्थ, खालापूर पंचायत समिती आणि शिवदुर्ग मित्र मंडळ-लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 2)  तालुक्यातील उंबरखिंडीत 361 वा विजय दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सरनौबत नेताजी पालकर यांनी कारतलबखान व महिला सरदार रायबाधन यांच्या फौजेवर उंबरखिंड (ता. खालापूर) येथे मोजक्या मावळ्यांसह 2 फेब्रुवारी 1661 रोजी विजय मिळवला. हा गौरवशाली इतिहास आजच्या पिढीला समजावा यासाठी दरवर्षी 2 फेब्रुवारी हा दिवस उंबरखिंडीत विजय दिन म्हणून साजरा केला जातो. बुधवारी प्रमुख मान्यवरांनी विजयस्तभ तसेच छत्रपती शिवाजी महाराज व सरनौबत नेताजी पालकर यांच्या प्रतिमांचे पूजन केले. या वेळी नेताजी पालकर यांचे जन्मगाव चौकमधून मशाल घेऊन शिवप्रेमी तरुण उंबरखिंड येथे ढोलताशांच्या गजरात दाखल झाले. खालापूर पंचायत समिती सभापती वृषाली पाटील, उपसभापती विश्वनाथ पाटील, सदस्या कांचन पारांगे, खालापूर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जे. पी. म्हात्रे, चावणी सरपंच मनिषा निरगुडे, उपसरपंच बाळासाहेब आखाडे, ग्रामपंचायत सदस्य अमोल कोडभर, लक्ष्मण घुटे, चिंधुबाई चव्हाण, संजना डफाळ, अनिता वाघमारे, गिता वाघमारे, आकाश घरडे, बाळशाहीर मते, प्रशांत साळुंखे यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बालशाहीर शौर्य आणि शिवशाहीर वैभव घरत यांनी पोवाडे व गीते सादर केली.

Check Also

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपच्या चार जणांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी …

Leave a Reply