Breaking News

जयपूर फूट, श्रवणयंत्रांचे शिबिरात मोफत वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

सिडको अध्यक्ष व भाजपचे जिल्हा अध्यक्ष  आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि साधू वासवानी मिशन (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी

(दि. 18) पनवेलमध्ये जयपूर फूट कॅम्प घेण्यात आला. या वेळी रुग्णांना जयपूर फूट तसेच श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले.

पनवेल शहरातील मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या शिबिराचा अनेक रुग्णांनी लाभ घेतला. या वेळी भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, कामगार नेते रवी नाईक, शहर चिटणीस अमरिश मोकल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एमपल्ले, डॉ. प्रतीक म्हात्रे, डॉ. सचिन जाधव, डॉ. संतोष आगलावे, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे कार्यालयीन सचिव अनिल कोळी, साधू वासवानी मिशनचे डॉ. मिलिंद जाधव, डॉ. तुशील ढगे, डॉ. सलील जैन व टीम, तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply