Monday , February 6 2023

माघी गणेश जयंतीनिमित्त कळंबोलीत विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

कळंबोली श्रेयश को. ऑप सोसायटीमध्ये सालाबादप्रमाणे यावर्षीही मंगळवारी (दि. 28) माघी गणेश जयंतीनिमित्त श्री गणेश मुर्तीचे पुजन आणि विविध कार्यक्रम सकाळी 12 वाजता आयोजित करण्यता आले आहेत. यामध्ये सकाळी 12 ते 1 वाजेपर्यंत श्री गणेश मुर्तीचे पुजन दुपारी 3 ते 6 आरोग्य शिबिर, सायंकाळी 4 ते 5 श्री सत्यनारायनाची महापुजा, सायंकाळी 5 ते 6अमहिलांसाठी हळदी-कुंकू, सायंकाळी 6 वाजता महाप्रसाद, सायंकाळी 7 ते रात्री 9 महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. तसेच या वेळी मामुस आला रे भास्कर वाकडीकर प्रस्तुत भन्नाट नृत्याचा सुरेख कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, कोकण विभाग म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील, स्थायी समितीचे सभापती प्रविण पाटील, भाजपचे रायगड जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपमहापौर जगदीश गायकवाड, प्रभाग समिती सभापती संजय भोपी, कळंबोली पोलीस निरीक्षक सतिश गायकवाड, वाहतुक पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर, नगरसेविका मोनिका महानवर, नगरसेवक महादेव मधे, अमर पाटील, राजेंद्र शर्मा, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे यांनी उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाचे ठिकाण कळंबोली येथील  श्रेयश को.ऑ.सोसायटी, से.15, प्लॉट नं.ए/4 हे असून निमंत्रक नगरसेविका प्रमिला रविनाथ पाटील, आयोजक भाजप कळंबोली शहर मंडल अध्यक्ष रविशेठ पाटील हे आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क अमोल पालवे 9082389191, किरण घाडगे 8652102103.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply